Friday, 18 August 2023

इतर ठिकाणी वाढदिवस साजरा न करता सामाजिक उपक्रम राबवून व कीर्तन महोत्सव घेऊन राजाभाऊ देशमुख यांचे अभिष्टचिंतन स्वागतार्ह-हभप इंदोरीकर

 


भोकरदन/प्रतिनिधी 

    हल्लीच्या काळात  वाढदिवस साजरा करण्याचा नवीनच प्रकार उदयास आला असून त्यात डीजे लावून रोडवर मद्यधुंद नाचणे,केक कापने असले प्रकार आपण नेहमीच पाहतोय,ऐकतोय आहेत. 

    परंतु काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचा वाढदिवस अगदी साध्या पध्दतीने सामाजिक उपक्रम राबवून, नेञ तपासणी शिबिरे व कीर्तन महोत्सव घेऊन साजरा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला हे स्वागतार्ह आहे असे  कीर्तन महोत्सव समारोप प्रसंगी महाराष्ट्रातील कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरिकर यांनी आपल्या कीर्तनात केले. 

    भोकरदन शहरामधील पोस्ट ऑफिस जवळील जि प कन्या शाळेच्या मैदानावर झालेल्या मा श्री राजाभाऊ देशमुख मिञमंडळ द्वारे आयोजित व तालुक्यातील भूमिपुत्र प्रसिद्ध कीर्तनकार हभप संतोष महाराज आढावणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कीर्तन महोत्सव समारोप कार्यक्रमास हभप विष्णु महाराज सास्ते,हभप सोरमारे महाराज व परिसरातील भजनीमंडळ आणि माजी आ सुरेशकुमार जेथलिया,कार्याध्यक्ष राजेंद्र राख,माऊली तनपुरे,उद्योजक मोहनशेठ हिवरकर,महादुशेठ राजपूत, हुकूमशेठ चुंडावत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांच्यासह भाविक भक्तांची उपस्थिती होती.

   महोत्सव यशस्वी करण्यासाठी मा श्री राजाभाऊ देशमुख मिञमंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त यांनी परिश्रम घेतले.

Wednesday, 5 May 2021

मराठा आरक्षणाची भूमिका न्यायालयात सादर करण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशीमराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार कधीच गंभीर नव्हतेभाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे




मराठा आरक्षणाची भूमिका न्यायालयात सादर करण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार कधीच गंभीर नव्हते
भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे
जालना : मराठा आरक्षणाची भूमिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यास राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडी चे सरकार अपयशी ठरले असून राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे व मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यास अकार्यक्षम ठरल्यामुळे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहे, तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार कधीच गंभीर नव्हते मराठा आरक्षण रद्द होण्यास राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार असल्याचे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी व्यक्त केले.
राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी चे सरकार असतांना व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडली होती त्यामुळे मराठा आरक्षणाची बाजू भक्कम होती परंतु राज्यात सत्तांतर होऊन राज्यामध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडी चे तिघाडी सरकार आले, या तिघाडी सरकारने तीनही पक्षामध्ये समन्वय न ठेवता मराठा आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे मांडण्यासाठी कोणतीही एकत्रित बैठक घेतली नसून, राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे मराठा आरक्षण टिकवण्यासाठी मसुदा योग्य सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे, त्यामुळे मराठा समाजावर फार मोठा अन्याय झाला असून या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे व मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे सर्वोच्च न्यायालयात मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार ने पायउतार व्हावे असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.